शेकापचे लढे
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त्य शेकापच्या प्रमुख लढ्यांवर टाकलेला प्रकाश…।
पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचे आजोबा नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सतत ७ वर्षे चाललेल्या ‘चरी’च्या शेतकरी संपाच्या फलीत १९३५ सालच्या कसेल त्याची जमीन ही घोषणा कुळ कायद्याच्या रुपात यशस्वी झाल्याचा अनुभव गाठीशी घेवून तसेच काँग्रेसच्या ब्राम्हणी व भांडवली कारभाराने होत असलेल्या घुसमटीने केशवराव जेधे-शंकरराव मोरे यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करून फुले शाहूंच्या विचारांना हाती घेऊन शेतकरी-कष्टकरी बहुजन वर्गाच्या हिताचे राजकारण करणे सुरु केलेले होते. त्यातूनच जनतेचे जे लढे उभे राहिले त्याला शेतकरी कामगार पक्षाने आणि पक्षाच्या नेत्यांनी बळ दिले व जनतेचे लढे यशस्वी केले.
हैद्राबादी मुक्ती संग्राम
सातारचे पत्रीसरकार
शेतकरी क्रांतीच्या हेतूने भारावलेल्या शेकापच्या नेत्यांची साताऱ्याची ही चळवळ सरकारी संस्थांवर बहिष्कार घालून त्यांना पर्यायी राष्ट्रीय संस्था उभी करण्याकरिता क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वात ही चळवळ सुरु करण्यात आलेली होती. प्रतिसरकारचे स्वरुप शेतकरी क्रांती, बहुजन सापेक्ष डावीकडे झुकलेली ही चळवळ होती. तिला शेतकरी क्रांतीचे पदचिन्ह मानून त्या दिशेने पुढे जाण्याच्या आकांक्षेने सातारा जिल्ह्यातील अनेक पुढारी शेकापकडे आकर्षित झाले. नाशिक, नगर भागातील पुढाऱ्यांची त्यांना साथ मिळालेली होती. या पत्रीसरकारच्या चळवळीने सरकारला नाकीनऊ आणलेले होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमा लढा
इगतपुरीचा लढा
रोजगार हमी कायद्यासाठी लढा
१९७१-७२ साली महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडलेला होता. दोन वेळच्या अन्नाची सोय नव्हती. त्यावेळी लोकांच्या हाताला काम नव्हते. कामाला दाम नव्हते, खायला अन्न नव्हते. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर उपासमार चालू होती. सरकारने धान्याची कोठारे सुरक्षित ठेवलेली होती. मात्र ती जनतेसाठी नव्हती. त्यामुळे त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे खासदार भाई उद्धवराव पाटील, माजी आमदार भाई चंद्रकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वात वैरागच्या शासकीय गोदामावर हाताला काम द्या, कामाचे दाम द्या नाहीतर पोटाला खायला अन्न द्या, या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला होता. ६ सप्टेंबर १९७१ रोजी निघालेल्या या भव्य मोर्चावर बंदोबस्तात नेमलेल्या पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले असता आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात शेतकरी कामगार पक्षाच्या एकनाथ साळुंखे, इब्राहिम शेख, सुंदराबाई चव्हाण, बब्रुवान माळी, भास्कर वाळके, रघुनाथ माने, चतुर्भूज ताकमाते यांना हुतात्मा व्हावे लागले. भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्यातही मोठे आंदोलन केल्या गेले. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बलिदानातून तसेच भाई गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात अभ्यासपूर्ण मांडणीमुळे अखेर १९७३ साली महाराष्ट्र सरकारला रोजगार हमी कायदा पारित करावा लागला.